Amrit Bharat Express : ४ राज्यांना थेट जोडणारी नवी 'अमृत भारत एक्सप्रेस' मंजूर! जाणून घ्या रूट आणि वेळ

Saam Tv

कोणत्या राज्यांना जोडते

नवीन अमृत भारत एक्सप्रेस गोरखपूरमार्गे धावणारी ही गाडी गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार यांना एकाच रेल्वे मार्गाने जोडेल.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pinterest

ट्रेनचा मार्ग व अंतर

ही ट्रेन गुजरातच्या भुज स्टेशनवरून निघून बिहारच्या बरौनी स्टेशनपर्यंत एकूण 2532 किलोमीटरचे अंतर कापेल.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pinterest

आठवड्यातून ३ दिवस धावणार

ट्रेन क्र. 19427 भुज येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवार सायंकाळी 5:30 वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी पहाटे 4:05 वाजता बरौनीला पोहोचेल

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | Pinterest

परतीची वेळ आणि वार

ट्रेन क्र.19428 बरौनी येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रात्री 11:55 वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी 1:15 वाजता भुज येथे पोहोचेल.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | Pinterest

प्रमुख थांबे

या प्रवासात ही ट्रेन सामखियाली, अहमदाबाद, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, मथुरा, बरेली, गोंडा, गोरखपूर, सिवान, छपरा, हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि समस्तीपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pinterest

सुविधा व फायदा

अमृत भारत एक्सप्रेस ही सर्वसामान्यांसाठी परवडणारी आणि आधुनिक सोयी-सुविधा असलेली सुपरफास्ट ट्रेन आहे. या ट्रेनमुळे व्यापारी, रोजंदार मजूर आणि देशभरात प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pintrest

गाडीमध्ये कोचची व्यवस्था कशी असेल

अमृत भारत एक्सप्रेस या गाडीमध्ये ११ जनरल क्लास डबे, ८ स्लीपर क्लास डबे, एक पॅन्ट्री कार आणि दिव्यांगांसाठी सामानविरहित २ डबे असतील.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pintrest

कोणत्या विशिष्ट सुविधा दिल्या जातील

या ट्रेनमध्ये सेमी-ऑटोमॅटिक कपलर, आग शोध प्रणाली आणि सीलबंद गँगवे यांसारख्या विशिष्ट सुविधा उपलब्ध असतील.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | pintrest

या गोष्टीची काळजी घ्या

दोन्ही दिशेच्या प्रवाशांना आठवड्यातून तीन दिवस या सेवेचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे बुकिंग सुरू झाल्यानंतर, तिकीट काढताना तुम्हाला ट्रेनचा दिवस आणि उपलब्धता तपासावी.

२५०० किमीचा प्रवास होणार सुपरफास्ट | PINTREST

NEXT :सकाळी सकाळी या 6 पैकी 1 ड्रिंक नक्की ट्राय करा, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये

High blood pressure | saam tv
येथे क्लिक करा