Manasvi Choudhary
लांब, काळे, चमकदार आणि दाट केस हे प्रत्येक स्त्रीला हवे असतात यासाठी महिला अनेक उपाय करतात.
परंतु आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे केस गळणे, कोरडे होणे आणि केस न वाढणे या समस्या निर्माण झाल्या आहेत.
मात्र केसांच्या या समस्यांवर तुम्ही घरगुती आयुर्वेदिक उपाय करा फायदेशीर ठरेल. आवळ्याचा रस केसांच्या वाढीसाठी अंत्यत फायदेशीर मानला जातो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे घटक टाळूचा रक्तप्रवाह सुधारतात आणि केसांच्या मुळांना पोषण पुरवतात.
नियमितपणे आवळ्याचा रस प्यायल्याने केसांच्या मुळांमधील कमकुवतपणा दूर होतो, ज्यामुळे अचानक होणारी केस गळती झपाट्याने कमी होते.
आवळ्यामध्ये कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे गुणधर्म असतात, जे नवीन केसांच्या वाढीस मदत करतात आणि केस लांब व घनदाट बनवतात.
आवळ्यामधील पोषक घटक केसांमधील नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या दूर होते.