Shreya Maskar
आवळा कँडी बनवण्यासाठी आवळा, साखर, पाणी, लिंबाचा रस, वेलची पावडर आणि पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते.
आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळा चांगला धुवून गरम पाण्यात उकळवा.
आवळा थंड झाल्यावर त्यातील बिया काढून कुस्करून घ्या.
आता पॅनमध्ये मॅश आवळा घालून साखर आणि पाणी मिसळा.
आता हे मिश्रण जेलीसारखे घट्ट होईपर्यंत मिक्स करा.
मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात लिंबाचा रस आणि वेलची पावडर घाला.
आता ट्रेला बटर लावून आवळा कँडी मिश्रण पसरवून ८-९ तास फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा.
शेवटी पिठीसाखरेत आवळा कँडीचे तुकडे घोळवून घ्या.