Manasvi Choudhary
बॉलिवूडचे बादशाहा अमिताभ बच्चन अशी त्यांची ओळख आहे. आज अमिताभ बच्चन त्यांचा 83 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन एव्हरग्रीन अभिनेते आहेत. त्याच्या सिनेसृष्टीतील कारकीर्द मोठी आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रूपये इतकी आहे.
अमिताभ यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे 16 कार आहेत ज्यांची एकूण किंमत 17.66 कोटी रुपये आहे.
अलिशान कारमध्ये अमिताभ बच्चन यांच्याकडे BMW, मर्सिडीज आणि रेंज रोव्हर यासह अनेक कारचं कलेक्शन आहे.
चित्रपट, टिव्ही, शो या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन ब्रँड अम्बेसेडर आहेत. एका जाहीरातीसाठी अमिताभ 5 ते 6 कोटी रूपये घेतात.