ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमेरिका आणि भारत यांच्यात दुग्धजन्य पदार्थांवरील व्यापार कराराची चर्चा सुरु झाल्यापासून नॉनव्हेज दूध म्हणजेच मासांहारी दूध चर्चेत आहे.
ज्या गायींना चाऱ्यांमध्ये ब्लड मील, मासे किंवा कोंबडीचे वाळलेले म्हणजेच मासांहारी पदार्थ दिले जातात, त्या गायीच्या दूधाला नन व्हेज दूध म्हणतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बाजारात मिळणारे दूध नॉन व्हेज आहे की नाही हे कसे ओळखायचे, जाणून घ्या.
बाजारात मिळणाऱ्या दूधाच्या पाकिटावर लिहिलेले असते की, ते शुद्ध शाकाहारी आहे. याचा अर्थ असा की, गायींना आणि म्हशींना फक्त शाकाहारी चारा देण्यात आला आहे.
याशिवाय, इतर खाद्यपदार्थांवर हिरवा टॅग असतो ज्याचा अर्थ पदार्थ शाकाहारी आहे.
परदेशातून भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या सर्व पॅकेज्ड डेअरी उत्पादनांवर 'rBST फ्री' किंवा 'हार्मोन फ्री' असे लिहिलेले असते. जर 'rBST Free' किंवा 'Hormone Free' लिहिले नसेल तर ते मांसाहारी असू शकते.
याशिवाय, दूध खरेदी करणाऱ्या बँडच्या वेबसाइटला भेट द्या आणि ते गायींना कोणत्या प्रकारचा आहार देत आहेत ते जाणून घ्या.