Manasvi Choudhary
उन्हाळ्यात बाजारात आंबे विकत घ्यायला ग्राहकांची गर्दी झाली आहे. मे महिन्यात आंब्याचे विविध पदार्थ घरी बनवतात. कच्चा आंब्याचे लोणचे, चटणी, ज्यूस, पन्हं या रेसिपी तुम्ही देखील ट्राय केल्या असतील .
मात्र तुम्ही कधी कच्चा आंब्याचा गोड लोणचा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही सोपी रेसिपी आजच ट्राय करा.
कच्चा आंब्याचा गोड लोणचा जेवणाची चव आणखी वाढवतो. तुम्ही चपाती किंवा पुरीसोबत गोड लोणचा खाऊ शकता.
लोणचे बनवण्यासाठी कच्चे आंबे, गूळ, मोहरी, मीठ, हळद, लाल मसाला, बडीशेप, जिरे, मेथी हे साहित्य एकत्र घ्या
1) सर्वातआधी कच्चे आंबे स्वच्छ धुवून कोरडे पुसून घ्या. त्यानंतर आंब्याची हिरवी साल काढा.
2) सोललेल्या आंब्याचे बारीक चौकोनी काप करा त्यातील आतला बी बाजूला फेकून द्या.
3) एका प्लेटमध्ये आंब्याच्या बारीक केलेल्या फोडीमध्ये मीठ आणि हळद मिक्स करा.साधारण दोन ते तीन तास हे मिश्रण बाजूला ठेवा जेणेकरून यातील ओलावा कमी होईल.
4) गॅसवर कढईत बडीशेप, जिरे, मेथी परतून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या म्हणजे लोणच्याला छान चव येते.
5) कढईमध्ये तुम्ही मोहरीचे तेल घ्या त्यात गुळाचे तुकडे आणि पाणी मिक्स करा. हे दोन्ही मिश्रण चांगले शिजवा. गूळ वितळू द्या.
६) गुळाच्या पाक तयार झाल्यानंतर त्यात मीठ घाला. आंब्याच्या फोडी मिक्स करा. मिरची पावडर, भाजलेले मसाले कूठ घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करा.
७) गॅस बंद केल्यानंतर लोणचे थंड करा. एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये कच्चा आंब्याचे लोणचे भरून ठेवा.