Siddhi Hande
राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसात फिरायला जायला सर्वांनाच आवडते.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार दिसते.
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो.
आंबोली हे ठिकाणी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
आंबोली येथे सरासरी ७४७ सें.मी पाऊस पडतो.
आंबोली हे महाराष्ट्रातील सह्याद्रीतील पर्वतरांगेत वसलं आहे.
पावसाळ्यात आंबोली येथील निसर्गसौंदर्य अजूनच खुलते.आंबोली घाटात सगळीकडे हिरवी झाडे पाहायला मिळतात.
याचसोबत पांढरेशुभ्र धबधबे ओसंडून वाहत असतात.येथील अनुभव हा विलोभनीय आहे.
आंबोलीतील निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात.