Shruti Vilas Kadam
तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे, मीठ आणि पाणी लागेल. हे साहित्य स्वच्छ धुऊन घ्या.
तांदूळ आणि उडीद डाळ 6-7 तास भिजत ठेवा. थोडे मेथी दाणेही त्यात घातल्यास चव आणि टेक्स्चर छान येते.
भिजवलेले तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. बॅटर थोडं जाडसर आणि स्मूद असावं.
तयार बॅटर 8-10 तास झाकून उबदार ठिकाणी ठेवा. यामुळे अंबोळी मऊ आणि स्पॉंजी होते.
तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडं तेल लावा. नॉन-स्टिक किंवा लोखंडी तवा वापरू शकता.
बॅटर तव्यावर ओतून थोडं जाडसर पसरवा. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी शिजवा.
गरमागरम अंबोळी नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. नाश्त्यासाठी हा उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे.