Shreya Maskar
कोकणातील आंबोली हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्हाला येथे रस्त्यावर दाट धुक्यांची चादर पाहायला मिळते.
आंबोली जवळ असे अनेक धबधबे आहेत जिथे गर्दी अजिबात नसते आणि सौंदर्य मनाला शांती देते.
नांगरतास धबधबा हा अरूंद दरीत वसलेला आहे. तो खूप उंचावरून कोसळतो.
नांगरतास धबधबा या धबधब्याजवळ छोटे मंदिर आहे. जे धनगर बांधवांचे आहे.
रामतीर्थ धबधबा हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने वाहतो.
रामतीर्थ धबधबा आजरा तालुक्यात येतो.
आंबोली जवळ असलेल्या गेळे गावात कावळेसाद धबधबा आहे.
या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा उलट्या दिशेने वाहतो.