Manasvi Choudhary
आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातीस निसर्गरमस्य सुंदर असा घाट आहे. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
सातारा आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाट महाबळेश्वर आणि कोकणातील पोलादपूर या मार्गांना जोडतो.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून या घाटाचे दृश्य मोहिनी घालते. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. धुक्याची चादर आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात.
घाटातील वळणदार रस्त्यांमुळे हा घाट धोकादायक आहे. येथून वाहने काळजीपूर्वक चालवणे महत्वाचे आहे.
मुंबई- गोवा हायवे मार्गे तुम्ही पोलादपूरहून महाबळेश्वरच्या दिशेने जाताना आंबेनळी घाट सुरू होतो.
सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांमधून आणि कड्या-कपारींमधून जाणारा हा घाट पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.