Manasvi Choudhary
लठ्ठपणा या समस्येने महिला त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. जिममध्ये एक्सरसाईज करतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? तुम्ही घरच्या घरी ५ सोपे योगाप्रकार केल्याने तुमची पोटावरची चरबी कमी होईल.
फलकासन योगा केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. फलकासन योगा प्रकार करताना तुम्हाला पुश-अप्स स्थितीत राहून हात, मनगट आणि कोपरांवर दाब देऊ शरीर वर करायचे आहे.
पोट आणि पाठ सुडौल करण्यासाठी धनुरासन हा योगा प्रकार बेस्ट आहे. धनुरासन केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
त्रिकोणासन हा व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू सक्रिय होता. मांड्याचा व्यायाम होतो. पाठदुखीपासून देखील आराम मिळतो.
पाठीवर झोपून, गुडघे वाकवा आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून हा व्यायाम प्रकार करा यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
अधो मुख श्वानासन हा व्यायाम प्रकार केल्याने हात, मांड्या, पाठीचा व्यायाम होतो. स्नायूंमधील ताण कमी होतो.