Shreya Maskar
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात अंबागड किल्ला वसलेला आहे. हे ऐतिहासिक ठिकाण नागपूरपासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर आहे.
अंबागड किल्ल्याचे बांधकाम साधारण इ.स. १७०० च्या सुमारास झाले आहे. देवगडचा गोंड शासक बख्त बुलंद शाह याच्या अधिपत्याखालील सुभेदार राजा खान पठाण याने हा किल्ला बांधला.
व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवणे आणि शत्रूच्या आक्रमणांपासून प्रदेशाचे संरक्षण करणे, हा अंबागड किल्ला उभारण्यामागील प्रमुख उद्देश होता.
अंबागड हा डोंगरी किल्ला असून त्याची रचना संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. किल्ल्याचा परिसर लंबगोलाकार आहे.
माची आणि तिच्यावरचा लहान बालेकिल्ला असे दोन भाग किल्ल्याचे आहेत. शत्रूला रोखण्यासाठी दगडी तटबंदी आणि बुरुज बांधण्यात आले होते.
किल्ल्याची उंची अंबागड किल्ला समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे १,४९०–१,५०० फूट आहे. अंबागड किल्ल्याचा इतिहास गोंड राजवटीचा काळ, नागपूरकर भोसल्यांची सत्ता आणि ब्रिटिश काळ आणि १८१८ चे बंड या तीन प्रमुख सत्तांशी जोडलेला आहे.
अंबागड किल्ला हा कैद्यांसाठी तुरुंग म्हणून वापरला गेला होता. मुंबईहून नागपूरपर्यंत रेल्वेने प्रवास करा. त्यानंतर नागपूर स्टेशनपासून रिक्षाने आंबागड गावापर्यंत पोहचाल. पुढे किल्ल्यापर्यंत ट्रेक करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.