ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यामध्ये पालकची भाजी खाणे अत्यंत फायदेशीर मानली जाते.
पालकमध्ये असलेले आयरन शरीरामध्ये रक्त वाढवण्याचे आणि थकवा कमी करण्यास खुप मदत होते.
नियमित पालक खाल्याने त्याचे सेवन केल्याने स्किनवरील ग्लो वाढतो.
पालकमध्ये असलेले फायबरमुळे पचनक्रिया अधिक चांगली होते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.
पालकमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्रि रॅडिकल्सपासून वाचवून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात आणि सांधेदुखी कमी करतात.
पालकातील व्हिटॅमिन K रक्ताभिसरण नियंत्रित करून हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करते.