Manasvi Choudhary
लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यास तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? लिंबू पाण्यात काळे मीठ घालून प्यायल्याने देखील फायदा होतो.
काळे मीठ केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे. शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही साध्या मीठाऐवजी काळ्या मीठाचे सेवन केले पाहिजे.
अनेकांना सकाळी उठल्यानंतर गॅस, अॅसिडीटी, पोटाची जळजळ या समस्या उद्भवतात अशावेळी तुम्ही लिंबू पाण्यात काळे मीठ घालून त्याचे सेवन करू शकता.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही या ड्रिंकचे सेवन करणे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर काळे मीठ टाकून लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा देखील सुधारते. लिंबू आणि काळे मीठाचे पाणी शरीरातील पीएच लेवल स्थिर ठेवते यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाही.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात थोडेसे काळे मीठ टाकून पिऊ शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.