Dhanshri Shintre
हिवाळ्याच्या सुरूवातीला बाजारात मटारचे वाटणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होतात, जे खूप लोकप्रिय असतात.
हिवाळ्यात लोक मटारचे विविध पदार्थ तयार करतात, पण तुम्ही कधी मटारचं लोणचं चाखलं आहे का?
मटारचं लोणचं खूप चविष्ट आणि चटपटीत असतं. याची सोपी रेसिपी नक्कीच नोट करा आणि ट्राय करा.
मटारचे वाटाणे, बडीशेप, ओवा, हळद, लाल तिखट, लोणच्याचा मसाला, तेल, मीठ आणि आमचूर पावडर वापरा.
मटारच्या शेंगा सोलून स्वच्छ धुवा. वाटाण्याचं पाणी पूर्णपणे निघून कोरडे करून घ्या, हे लक्षात ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात बडीशेप आणि ओवा घालून चांगलं परतून घ्या.
आता मटार घालून हळद, लाल तिखट, आमचूर आणि लोणच्याचा मसाला घालून चांगलं मिक्स करा.
सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून, चवीनुसार मीठ घालून झाकण लावून हलक्या आचेवर शिजवा.
मटार मऊ होईपर्यंत फक्त ५ मिनिट शिजवा. मिश्रण करपू देऊ नका, लक्ष ठेवा.
मटार शिजल्यावर गॅस बंद करा. आता तुमचं स्वादिष्ट आणि चटपटीत मटार लोणचं तयार आहे.