ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी अनेकांना जेवनात भात खाणे जास्त आवडते.
अनकेकांकडून भात खाल्ला नाही तर पोट भरल्यासारख वाटत नाही असं आपण ऐकल असेल.
मात्र भात खाण्याचा नेमका काय फायदा होतो ते पाहूयात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सफेद तांदळात कार्ब्स मोठ्या प्रमाणात असते ,ज्यामुळे पांढरा भात खाल्ल्याने आपल्या शरीरास एनर्जी मिळते.
अनेकदा पोट खराब झाले की आपण हलका आहार घेतो त्यामध्ये भाताचा समावेश असतो.
पांढऱ्या तांदळात मॅग्नीज तसेच लोह आणि व्हिटॅमिन बीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
पांढऱ्या तांदळात मॅग्नेशियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि मॅग्नेशियम हाडासाठी गरजेचे असते.
पांढऱ्या तांदळात फॅटचे प्रमाण कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.