Children Care | मुलांची उंची वाढत नाही? ही योगासने करा

Shraddha Thik

मुलांच्या उंची

अनेक पालकांना त्यांच्या मुलांच्या उंचीची चिंता असते. जर तुमच्या मुलाची उंची वाढत नसेल तर त्याला कोणतेही सप्लिमेंट देण्याऐवजी तुम्ही त्याला योगा करायला लावू शकता.

Height | Yandex

योगासने लाभदायक ठरतील

मुलांची उंची वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना योगा करण्याचा सल्ला देऊ शकता. यामुळे मुलाची उंची कोणत्याही दुष्परिणामाशिवाय नैसर्गिकरित्या वाढेल. तुम्ही कोणत्या योगासनांची मदत घेऊ शकता.

Children Height | Yandex

ताडासन

मुलांची उंची वाढवण्यासाठी ताडासन हा एक चांगला पर्याय असू शकतो. हे आसन एखाद्या स्ट्रेचिंग व्यायामासारखे आहे. ताडासन केल्याने पाठीचा कणा सरळ होण्यास आणि मुलांची उंची वाढण्यास मदत होते.

Tadasana | Yandex

धनुरासन

धनुरासन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे मुलांची उंची वाढण्यास आणि पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. हे आसन केल्याने हाडे लवचिक होतात आणि स्रायू मजबूत होतात. या आसनाचा दररोज सराव केल्यास उंची वाढू शकते.

Dhanurasana | Yandex

वृक्षासन

मुलांची उंची नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्ही वृक्षासनाची मदत घेऊ शकता. या आसनाच्या मदतीने मांड्या, वासरे, घोटे आणि पाठीचा कणा मजबूत होतो. हे आसन मानसिक आरोग्यासाठीही खूप चांगले आहे.

Vrikshasan | Yandex

फुलपाखराची मुद्रा

फुलपाखरू आसन म्हणजेच बटरफ्लाय पोझ देखील उंची वाढवण्यास मदत करू शकते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे आसन केवळ मन शांत करत नाही तर मुलांच्या विकासातही मदत करते.

Butterfly pose | Yandex

उष्ट्रासन

उष्ट्रासन वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या आसनामुळे मुलांची मुद्रा सुधारते. यामुळे मुलांचा विकास वेगाने होतो.

Ustrasana | Yandex

Next : Glowing Skin | काळवंडलेली त्वचा उजळेल, असा करा कापूरचा वापर

Skin Glowing | Saam Tv
येथे क्लिक करा...