Manasvi Choudhary
हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचा हंगामा सुरू होतो. बाजारात देखील हिवाळ्यात स्ट्रॉबेरीची मागणी दिसते.
चवीला आंबट- गोड स्ट्रॉबेरी खायला सर्वांनाच आवडते पण स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का जाणून घ्या.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन- सीचे प्रमाण अधिक असते म्हणून हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाल्ली जाते.
हिवाळ्यात सर्दी, खोकला या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खातात.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराचील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होतो.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराची पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमुळे त्वचेलाही फायदा होतो. त्वचेतील आवश्यक असलेले कोलेजन तयार करतात त्यामुळे त्वचा चमकदार होते.
स्ट्रॉबेरी खाल्ल्याने डोळ्यांनाही फायदा होतो. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात, असे क्लिनिकल संशोधनात दिसून आले आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.