Manasvi Choudhary
मधामध्ये औषधी गुणधर्माचा मोठा साठा आहे. त्यामुळे मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससह एंझाइम्स, खनिजे, लोह, झिंक, पोटॅशिअम यासारखे पोषकतत्त्व देखील आहेत.
नियमित रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्यास आरोग्यास कित्येक लाभ मिळू शकतात.
मधाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मधाच्या सेवनामुळे पोटात हेल्दी बॅक्टेरियांची निर्मिती होते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते.
मधामध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीरातील पाणी- रक्ताची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते.
रिकाम्या पोटी मधाचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्याही कमी होते.