ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळ्याचे सेवन आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे शरीर, त्वचा आणि केस निरोगी रहाते.
आवळ्यामुळे शरीराचे डिटॉक्सिफीकेशन होते आणि चयाचाप सुधारण्यास मदत होते.
आवळा खाल्यामुळे तुमच्या शरीराची चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
आवळा मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते आवळ्याचे सेवन केल्यास शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
आवळ्याचे सेवन केल्यास तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते त्यामधील गुणधर्म केसांना चमकदार बनवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.