Shreya Maskar
कोकण स्टाइल अळूवडी बनवण्यासाठी अळूची पाने, बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, चिंच, गूळ, मसाले (लाल मिरची पूड, हळद, धणे पूड , आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट), तेल इत्यादी साहित्य लागते.
अळूवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये लाल मिरची पूड, हळद, धणे पूड , आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट सर्व मसाले मिक्स करा.
त्यानंतर दुसऱ्या मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, आले-लसूण पेस्ट, चिंच, गूळ मिक्स करा. पुढे या मिश्रणात मिक्स मसाल्याचे मिश्रण टाका.
बेसनच्या मिश्रणात हळूहळू पाणी मिक्स करून पेस्ट बनवा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
आता अळूची हिरवीगार पाने स्वच्छ धुवून देठ काढून पुसून घ्या. आता एक पान घ्या त्यावर तयार बेसनची पेस्ट पसरवा त्यावर पुन्हा एक पान ठेवा आणि बेसन पेस्ट लावा, असे ३-४ वेळा करा.
शेवटी अळूच्या पानांची एकसारखी गुंडाळी करा. कुकरमध्ये १५ ते २० अळूवडी शिजवून घ्या. अळूवडी थंड झाल्यावर त्यांचे छोटे छोटे तुकडे करा.
पॅनमध्ये तेल टाकून हळूहळू सर्व अळूवड्या खरपूस तळून घ्या. लक्षात घ्या गॅस कमी आचेवर ठेवा , जेणेकरून अळूवडी जळणार नाही आणि छान कुरकुरीत होतील.
कुरकुरीत अळूवड्यांचा झणझणीत पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा. एक घास खाताच कोकणची आठवण येईल.