Alisha Khedekar
अळशीमध्ये ओमेगा-3, फायबर आणि लिग्नॅन्स असतात. मात्र, जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
सामान्यतः प्रौढांसाठी दररोज एक ते दोन चमचे जवस पुरेसे मानले जाते. मात्र, वैयक्तिक गरजेनुसार प्रमाण बदलू शकते.
अळशी खाल्ल्यानंतर पोट फुगणे, गॅस किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर प्रमाण कमी करा आणि भरपूर पाणी प्या.
अळशीमध्ये भरपूर फायबर असल्याने ते घेताना पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.
अळशी खाल्ल्यानंतर खाज, पुरळ, सूज, श्वास घेण्यास त्रास किंवा घशात अस्वस्थता जाणवल्यास लगेच वैद्यकीय मदत घ्या.
अळशी हलकी भाजून किंवा दळून खाल्ल्यास आहारात मिसळणे सोपे होते. मात्र, जास्त भाजल्यास पोषक घटकांवर परिणाम होऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा