Shreya Maskar
पावसाळ्यात चटपटीत खावस वाटत असल्यास, आवर्जून आलू कुरकुरे बनवा.
आलू कुरकुरे बनवण्यासाठी लहान बटाटे, मैदा, पोहे, हिरवी मिरची, जिरे पावडर, पुदिन्याची पाने, मीठ, तेल, पाणी इत्यादी साहित्य लागते.
आलू कुरकुरे बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या.
उकडलेले बटाटे थंड झाल्यावर नीट मॅश करा.
एका बाऊलमध्ये पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, जिरेपूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या.
घोळवण्यासाठी सारण बनवताना बाऊलमध्ये मैदा आणि पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा.
बटाट्याच्या मसाल्याचे बनवलेले लांब, पातळ कुरकुरे मैदाच्या मिश्रणात घोळवून त्यानंतर पोह्यात त्यांना कोटिंग करून घ्या.
आता मंद आचेवर तेल गरम करून त्यात हे आलू कुरकुरे गोल्ड फ्राय करून घ्या.
टोमॅटो केचअप सोबत याचा आस्वाद घ्या.
पावसाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत आलू कुरकुरे खाण्याचा आनंद लुटा.