Ruchika Jadhav
आलू भुजीया शेव बनवण्यासाठी एकसारख्या आकाराचे चांगले बटाटे निवडा.
सर्व बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून याची सर्व साल काढून घ्या.
साल काढल्यानंतर त्या बटाट्याच्या कापांचा बारीक किस तयार करा.
शेव बनवण्यासाठी आपल्याला बेसन पिठाची आवश्यका आहे.
बेसन पिठात किसलेला बटाटा आणि आमचूर पावडर मिक्स करा.
या मिश्रणात तिखट, मीठ, हळद आणि मालवनी मसाला मिक्स करून घ्या.
टेस्टी चव यावी यासाठी यामध्ये पुदिना पावडर सुद्धा मिक्स करा आणि पीठ मळून घ्या.
तयार पिठाची छान कुरकुरीत शेव पाडून घ्या. ही शेव तुम्ही तेलात किंवा तुपात तळून घेऊ शकता.
आलू भुजीया जास्त दिवस टिकून रहावी यासाठी ती एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा.