Manasvi Choudhary
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. अनेक महिला व मुली चेहऱ्यावर कोरफड लावतात.
चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे काय फायदा होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘ई’, अँटीऑक्सिडंट्स, आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
कोरफडीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतात.
कोरफडीमध्ये ९९% पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे तेलकटपणा न वाढवता ही त्वचेला आतून हायड्रेट आणि मॉइश्चराइझ ठेवते.
चेहऱ्याची त्वचा काळी पडणे किंवा त्वचेवर लालसरपणा-जळजळ होणे या समस्येवर कोरफड बेस्ट आहे.
वयोमानानुसार किंवा प्रदूषणामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते.