पावसाळ्यात केस गळती कमी करतील स्वयंपाकघरातील हे 2 पदार्थ, वापर करण्याची पद्धतही सोपी

Manasvi Choudhary

पावसात केसांची घ्या काळजी

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणीय बदलामुळे टाळूवर चिकटपणा, कोंडा, बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

Wet Hair | Yandex

केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय

केसांच्या या समस्यांमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि गळतात. पावसाळ्यात तुम्ही देखील केसगळतीने हैराण असाल तर बाजारातील महागड्या केमिकल्सपेक्षा सोप्या घरगुती उपाय वापरून पाहा.

hair fall | yandex

स्वयंपाकघरातील पदार्थांचा करा वापर

कोरफड जेल आणि खोबरेल तेल केसांसाठी फायदेशीर मानले जाते. कोरफडमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे टाळूवरील खाज आणि इन्फेक्शन दूर करतात.

Home Remedies For Hair Fall Control

कसा करायचा वापर

१) ताजे कोरफड घ्या एका भांड्यामध्ये कोरफडचा गर आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करा.

२) हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून हलक्या हाताने मसाज करा.

३) त्यानंतर सौम्य शॅम्पूने कोमट पाण्याने केस धुवून टाका.

Aloe Vera Gel & Coconut Oil

मेथी दाणे आणि कडुनिंबाचा करा वापर

मेथीचे दाणे आणि कडुनिंबाचे वापर तुम्ही केसांसाठी करू शकता. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केस गळती थांबवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Fenugreek Seeds & Neem Water | yandex

कसा करायचा वापर

१) मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट तयार करा.

२) या पेस्टमध्ये कडुनिंबाचे पाणी मिक्स करून हेअर पॅक म्हणून केसांना लावा.

३) त्यानंतर साधारण ३० मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवा.

Fenugreek Seeds & Neem Water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Vatpurnima 2025: वटपौर्णिमेला 'या' रंगांच्या साड्या चुकूनही नेसू नका

येथे क्लिक करा..