ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एलोवेरा एक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात.
त्वचेच्या समस्येपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यावर कोरफड ( Aloe Vera) फायदेशीर आहे.
एलोवेरा जेलचे सेवन केल्याने छातीत जळजळ होणे, अॅसिडिटीचा त्रास होणे अशा समस्या दूर होतात.
फळे आणि भाज्या जास्त वेळे पर्यंत ताजे ठेवण्यासाठी एलोवेरा जेलचा उपयोग करु शकतो.
टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांनी रोज २ चमचा एलोवेरा जेलचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
एलोवेरा त्वचेच्या अनेक समस्यांसाठी रामबाण उपाय आहे. स्कीन केअर रुटीनमध्ये एलोवेराचा उपयोग केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
रिसर्चनुसार, एलोवेरा म्हणजेच कोरफडमुळे ब्रेस्ट कॅन्सरची वाढ रोखता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.