Saam Tv
लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सगळेच लहानपणापासून भिजवलेले बदाम खातात.
तुम्ही जर रिकाम्या पोटी काही महत्वाचे पदार्थ खाल्लेत तर तुमच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो.
तर काही मंडळी रोज सकाळी बदाम आणि अक्रोड हे दोन्ही खाणं पसंत करतात.
पण या पैकी काय सगळ्यात पौष्टीक आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
भिजवलेल्या बदामात प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदामाचे सेवन केले जाते. विद्यार्थ्यांसाठी हा सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे.
व्हिटॅमिन ई त्वचेला तेजस्वी बनवतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते. त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा बदाम खाल्याने होतो.