Manasvi Choudhary
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आहारात ड्रायफ्रुट सेवन महत्वाचे मानले जाते.
बदाम आणि पिस्ता हे दोन्ही ड्रायफ्रुट आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी बदाम आणि पिस्ता, या दोन्हीपैकी कोणते ड्रायफ्रुट्स फायदेशीर आहेत ते पाहूया.
बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात.
बदामामध्ये असणारे मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पिस्त्यामध्ये इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. यामध्ये प्लांट स्टेरोल्स असतात, जे कोलेस्ट्रॉल शोषून घेण्याची शरीराची क्षमता सुधारतात.
पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण उत्तम असते, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.