Manasvi Choudhary
केसांच्या वाढीसाठी तेल लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण केसांना तेल लावल्याने पुरेसे पोषण मिळते. केसांना केवळ चांगल्या दर्जाचा शाम्पू लावून उपयोग नाही, तर नियमित तेल लावणेही महत्त्वाचे ठरते.
केस निरोगी ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे तेल मिळतात, मात्र अनेकांना बदामाचे की नारळाचे कोणते तेल केसांना लावावे? असा प्रश्न पडतो. केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी या दोन्ही तेलांचे फायदे जाणून घ्या.
१) व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले बदामाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
२) हे तेल टाळू स्वच्छ करते, ज्यामुळे कोंडा कमी होतो आणि केस मजबूत होतात.
३) बदामाच्या तेलाचा पोत हलका असतो, त्यामुळे तुम्ही ते तेलकट टाळूवरही सहज लावू शकता.
१) नारळ तेल केसांना खोलवर कंडिशनिंग करते तसेच प्रोटीनचे नुकसान टळण्यास मदत करते.
२) नारळ तेल केसांना लावल्याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
३) नारळाचेे तेल कोरड्या आणि खराब केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेल टाळूवरील कोरडेपणा आणि कोंडा कमी करण्यास मदत करते
दोन्ही तेले तुमच्या केसांसाठी फायदेशीर आहेत.
बदामाचे तेल केसांना हलका ओलावा देते, तर नारळाचे तेल केसांना खोलवर कंडिशनिंग करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.