Shreya Maskar
बदाम-गुळाची पुरणपोळी बनवण्यासाठी बदाम, केशर, वेलची पूड, गूळ, दूध, गव्हाचे पीठ, मीठ, पाणी आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
बदाम-गुळाची पुरणपोळी बनवण्यासाठी बदाम गरम पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवून त्याची साले काढून घ्या.
साल काढलेले बदाम आणि दूध यांची मिक्सरला पेस्ट बनवा.
एका बाऊलमध्ये बदाम पेस्ट, साखर, गूळ, केशर आणि वेलची पूड टाकून मिक्स करा.
बदामाचे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या.
गव्हाचे पीठ, मीठ, तेल टाकून पोळीसाठी कणिक मळून घ्या.
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्यात बदाम-गुळाचे पुरण भरा.
शेवटी तुपात बदाम-गुळाची पुरणपोळी खरपूस भाजून तुपासोबत त्याचा आस्वाद घ्या.