ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलिया भट्ट अलीकडेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलसाठी जेद्दाला गेली होती, जिथे तिने एक आकर्षक काळा मिडी-लेन्थ बॉल गाऊन घातला होता .
आलियाचा हा ड्रेस विंटेज कलेक्शनचा एक भाग आहे. तर तिचा ड्रेस आणि दागिने, सर्वकाही तिच्यावर शोभून दिसत होते.
आलियाने या इव्हेंटकरिता १९५५ मध्ये पियरे बालमेन डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. ७० वर्षांच्या हा जुना ड्रेस खास फ्लोरिलेज लाइनसाठी बनवण्यात आला होता.
आलियाच्या गाऊनमध्ये नेट पॅटर्न होता, तिच्या लूकला एकदम परफेक्ट अशी नेकलाइन होती. या आउटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.
आलियाने क्लासिक गुच्ची सनग्लासेस घालून हा लूक पूर्ण केला. सनग्लासेस लावून ती एकदम बॉसी आणि बोल्ड दिसत आहे.
आलियाने या विंटेज ब्लॅक ड्रेससोबत डायमंड चोकर नेकलेस घातला आहे जो उठून दिसत आहे. तसेच डायमंड स्टड इअररिंग्जने लूकमध्ये आणखी भर घातली आहे.
आलियाचा मेकअप या क्लासिक लूकला शोभून दिसत होता. सॉफ्ट कर्लमध्ये केस उघडे ठेवून, तिचा लूक खूप लोकप्रिय झाला असून आलिया चर्चेचा विषय बनली आहे.