Shruti Vilas Kadam
आलियाने पीच आणि केशरी रंगांच्या छटांनी सजलेली नऊवारी साडी परिधान केली होती. साडीच्या खालच्या भागात आणि काठावर फुलांच्या नक्षीचे डिझाइन होते, ज्यामुळे साडीला एक खास आकर्षण प्राप्त झाले.
तिने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला होता, ज्यावर हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या धाग्यांची आणि सिक्विन्सची नक्षी होती. हा ब्लाउज साडीच्या पारंपरिकतेला मॉर्डन टच देतो.
आलियाने आपल्या केसांची अंबाडा बांधला असून त्यावर पांढऱ्या फुलांचा गजरा लावला होता.
तिने स्मोकी आयशॅडो, हलका लिपस्टिक, हिरव्या रंगाची बिंदी आणि मोत्यांचे व हिरव्या रंगाचे स्टडेड कानातले परिधान केले होते. तिच्या या लुकमध्ये एक सुंदर अंगठी आणि साधा ब्रेसलेटही होता.
तिने पारंपरिक कोल्हापुरी चप्पल परिधान केल्या होत्या, ज्यामुळे तिच्या लुकला एक पूर्णता प्राप्त झाली.
आलिया भट्टने मुंबईतील Jio World Convention Centre येथे आयोजित WAVES Summit 2025 मध्ये या लुकमध्ये उपस्थिती दर्शवली.
आलियाच्या या मराठमोळ्या लुकला सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी तिच्या पारंपरिक पोशाखाची आणि सौंदर्याची स्तुती केली.