Shruti Vilas Kadam
या चित्रपटात आलियाने क्लासी रंगांची पारंपरिक साडी परिधान केली होती. तिचा हा एलिगंट लुक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या स्टाइलने प्रेरित होऊन आलियाने क्लासी लूक केला होता.
दुर्गापूजेत आलिया फ्रंट पल्लू स्टाईलमध्ये साडी नेसून आली होती. पारंपरिक ज्वेलरी आणि गजऱ्यामुळे तिचा लुक अधिक मोहक झाला.
गुलाबी रंगाच्या शिमरी साडीत आलियाने आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण लुक साकारला. हलक्या मेकअप आणि स्मोकी आयजमुळे तिचा हा अवतार हायलाइट झाला.
‘पोचार’ सीरीजच्या स्क्रीनिंगमध्ये आलिया ब्लॅक अँड गोल्डन साडीत दिसली होती. या लुकमध्ये ती रेट्रो चार्म आणि आधुनिक एलिगन्सचे मिश्रण दिसली.
मेट गाला २०२४ मध्ये आलियाने साब्यसाचीच्या व्हाईट हँडक्राफ्टेड साडीत एंट्री घेतली. तिच्या ग्रेसफुल पोझेसने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने साधी परंतु देखणी सिल्क साडी परिधान केली होती. मिनिमल मेकअप आणि बांधलेल्या केसांमुळे तिचा लुक ‘सिंपल इज ब्यूटीफुल’ या अर्थाने परिपूर्ण वाटला.