Shreya Maskar
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अलिबाग उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे समुद्रकिनारी तुफान मजा करू शकता. मित्रांसोबत फिरायला हे खास ठिकाण आहे.
अलिबाग जवळ अक्षी बीच नावाचा एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. वन डे ट्रिपसाठी हे खास लोकेशन आहे.
अलिबागमधील अक्षी समुद्रकिनारा शांत, कमी गर्दीचा , स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. येथे पक्षीनिरीक्षण करण्यासाठी आवर्जून जा.
फोटोशूट करण्यासाठी हे सुंदर लोकेशन आहे. तसेच अक्षी समुद्रकिनारा नारळाच्या बागांनी वेढलेला आहे. सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
अक्षी बीचवर तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. उदा. बनाना बोट राईड, बंपर राईड, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, आणि बोटिंग
अलिबाग जवळील अक्षी गावात मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख आहे. असे बोले जाते.
तुम्हाला न्यू इयरला मोठी ट्रिप प्लान करायची असेल तरी देखील तुम्ही अक्षी बीचला भेट देऊ शकता. आजबाजूला खाण्याची, पिण्याची उत्तम सोय आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.