Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूड असो वा टॉलीवूड चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची स्टाईल फॉलो करतच असतात.
नुकताच अभिनेता अक्षय खन्नाच्या नवीन चित्रपटातला 'महाकाली'मधील लूक व्हायरल झाला आहे.
चित्रपट प्रदर्शित झालेला नसला तरी अक्षय खन्नाचे चाहते त्याच्या लुकला भरपूर प्रतिसाद देत आहे.
अक्षय खन्नाचा हगा लुक अजुनही जाहीर केलेला नाही. यामुळे अक्षय शुक्राचार्च ऋषींच्या भूमिकेत दिसणार आहे.
यापुर्वी प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या भुमिकेत या अभिनेत्याने पुनरागमन केले.
अक्षय खन्नाची ती भुमिका आता चाहत्यांच्या मनात कायम घर करुन राहणार आहे.
'महाकाली' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांना कास्टींगवर जास्त विचार न करता ही मुख्य भुमिका अक्षय खन्नाला दिली आहे.
याचसोबत प्रशांत वर्मा यांनी 'महाकाली'मधील अक्षय खन्नाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे. यामध्ये अक्षय खन्ना असुरगुरु शुक्राचार्याच्या भुमिकेत असणार असल्याचे पाहायला मिळाले.