Manasvi Choudhary
हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथिला अक्षय्य तृतीया साजरी करतात.
यंदा उद्या म्हणजेच १९ एप्रिलला अक्षय्य तृतीया सर्वत्र साजरी होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून देवीला नैवेद्य दाखवला जातो. यंदा अक्षय्य तृतीयेच्या पूजेत तुम्ही आंब्याचा शिरा नैवेद्य अर्पण करा.
आंब्याचा शिरा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी रवा,तूप, आंबा, बदाम, काजू, दूध, पाणी हे साहित्य घ्या.
सर्वातआधी आंबे स्वच्छ धुवून , सोलून त्याच्या बारीक फोडी करा. मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या फोडी बारीक करून घ्या.
गॅसवर कढईमध्ये साजूक तूप घाला. नंतर या तूपामध्ये रवा चांगला परतून घ्या. रवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यात बारीक केलेले काजू- बदाम मिक्स करा.
नंतर या मिश्रणात दूध मिक्स करून मिश्रण ढवळथ राहा. या मिश्रणात साखर आणि वेलची पावडर मिक्स केल्याने चव येईल.
मिश्रण चांगले शिजल्यानंतर त्यात आंब्याचा पल्प घालून व्यवस्थित एकजीव करा. २ ते ३ मिनिटे मिश्रण वाफेवर शिजवल्यानंतर आंब्याचा शिरा तयार आहे.