Manasvi Choudhary
अक्षय्य तृतीया का साजरी करतात?या सणाचा मागचा नेमका इतिहास काय आहे हे जाणून घ्या.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी होते. साडेतीन मुहूर्तीपैकी एक हा सण अत्यंत शुभ मानला जातो.
पौराणिक कथेनुसार, अक्षय्य तृतीयेच्यादिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णाचाही जन्म झाला त्यामुळे अक्षय्य तृतीयेला स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा केली जाते.
अक्षय्य तृतीया या सणाला सोनं खरेदी केल्यास भाग्य लाभते असे म्हणतात. प्राचीन काळापासून सोनं हा धातू धन-संपत्तीचं प्रतीक मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन खरेदी केल्याने घरात सुख - समृद्धी येते.
अक्षय्य तृतीयेनंतर दिड महिन्यांन मान्सूनला सुरूवात होणार असते गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीवर मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करण्याची प्रथा आहे.