ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येत्या ३० एप्रिलला अक्षय तृतीय आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो. त्यामुळे याशिवाशी सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी एकच गर्दी झालेली असते पण यादिवशी सोनं खरेदी केल्यावर कोणता फायदा होतो ते जाणून घेऊयात.
अक्षय तृतीया हा असा दिवस सौभाग्य आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी कधीच "क्षय" होत नाही. त्यामुळे या दिवशी सोनं खरेदी केल्याने सौभाग्य आणि आर्थिक समृद्धी वाढते, असा समज आहे.
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात धनलाभाचे दरवाजे खुलतात. व्यवसायात आणि नोकरीत यश मिळण्याची शक्यता वाढते.
सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
या दिवशी खरेदी केलेले सोने शुभ मानले जाते आणि हे सोनं केवळ संपत्तीच नाही तर कौटुंबिक परंपरेचा भाग म्हणूनही पुढच्या पिढ्यांना दिलं जातं.
अनेक गुंतवणूकदार या दिवशी शेअर्स किंवा गोल्ड बॉण्ड्स खरेदी करतात. या काळात गुंतवणुकीला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते.
या दिवशी सोनं खरेदीसह, घर, गाडी, जमीन, व्यवसायाची सुरुवातही शुभ मानली जाते. त्यामुळे नवीन निर्णय घेण्यास हा दिवस उत्तम.
धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी केलेली खरेदी हे नुसते आर्थिक नव्हे, तर मानसिक समाधान आणि आध्यात्मिक श्रद्धेचंही प्रतीक मानलं जातं.