Siddhi Hande
भारतीय सणांमध्ये अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला नवीन वस्तू खरेदी करायच्या असतात.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते.
अक्षय्य तृतीया हा एक अबूझ मूहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यातून मिळणारे फळ हे अक्षय असते. त्याचा कधीही क्षय होत नाही.
जीवनात कायमस्वरुपी आनंद, भरभराट आणि समृद्धी मिळावी, यासाठी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.
हिंदू धर्मात सोने आणि चांदी खरेदी करणे धनलक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे म्हणजे लक्ष्मीला आपल्या घरी आमंत्रित करण्यासारखे आहे. त्यामुळे धनलाभ होतो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ना फक्त सोने तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा धातू खरेदी केला तर प्रगती होईल.
अक्षय्य तृतीया दिवस देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना समर्पित आहे.
शास्त्रानुसार, पिवळ्या रंगाचे सोने शुद्ध मानले जाते. या दिवशी धातू खरेदी केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तुमची आर्थिकदृष्ट्या भरभराट होते.