Siddhi Hande
येत्या रविवारी १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा साडेतीन मूहूर्तांपैकी एक मूहूर्त आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीला जास्त महत्त्व दिले जाते. मात्र, सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सोनं परवडत नाही.
यंदाच्या अक्षय्य तृ्तीयेला सोनं नव्हे तर या गोष्टी खरेदी करा. तुमच्य कुटुंबाची भरभराट होईल.
चांदी ही चंद्राची आणि शुक्राची धातू मानली जाते. चांदी सुख आणि समृद्धीचे प्रतिक आहे. तुम्ही चांदीचे नाणे खरेदी करु शकतात.
कापूस शुद्धता आणि शांततेचे प्रतिक आहे. या दिवशी कापूस खरेदी करा. देवासमोर कापसाचा दिवा लावल्याने वातावरण छान राहते.
तुम्ही मातीचे भांडे किंवा माठ खरेदी करु शकतात. तुम्ही या माठात पाणी भरुन जलदान करावे. हेदेखील खूप प्रभावी मानले जाते.
शास्त्रात, मीठाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. तुम्ही सैंधव मीठ घरी आणल्याने वास्तुदोष दूर होतो.
तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तुळस जिथे असते तिथे लक्ष्मी वास करते, असं म्हणतात. अक्षय्य तृतीयेला तुळस घरी आणणे शुभ मानले जाते.
पिवळा रंग भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. या दिवशी सोनं खरेदी करणे शक्य नसेल तर पिवळ्या रंगाची वस्तू किंवा कपडे खरेदी करा.