Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचे मार्गदर्शन देणारे थोर विचारवंत मानले जातात.
चाणक्यांनी आयुष्यात पुढे जाताना कोणत्या गोष्टी ठिकाणी शांत राहिलं पाहिजे आणि त्याने तुम्हाला काय फायदा होतो? याबद्दल मार्गदर्शन दिले आहे.
चाणक्यांच्या मते कधीच कोणाच्या भांडणांमध्ये बोलायला जाऊ नका. त्यावेळेस शांत राहिणं खूप गरजेचं आहे.
चाणक्यांच्या मते, तुम्ही जर एखाद्याच्या भांडणात तुमचं मत व्यक्त करत असाल तर याने तुम्ही संकटात येऊ शकता आणि मान-सन्मान सुद्धा गमावू शकता.
जर एखाद्या महत्वाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केलं जात असेल तर तुम्ही शांत राहणं फायद्याचं ठरेल.
तुम्ही जर तुमचे कौतुक करत असतील आणि काही त्यांच्यात मिसळून बोललात तर लोक तुमचा लगेचच अपमान करतील.
जर एखाद्या महत्वाच्या ठिकाणी महत्वाच्या विषयावर लोक बोलत असतील आणि तुम्हाला त्याविषयी माहित नसेल तर तुम्ही शांत राहा.
तुम्ही जर अशा जागी काही वेगळ्या मुद्यावर बोललात तर तुमचा लोक अपमान करु शकतात.
एखाद्या ठिकाणी लोक एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असतील अशा ठिकाणी बोलणं टाळा.