Shreya Maskar
अकोला येथे गेल्यावर अकोला किल्ला पाहायला नक्की जा. अकोला किल्ला हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील अकोला शहराच्या मध्यभागी मोरणा नदीच्या काठावर अकोला किल्ला म्हणजे असदगड आहे.
१७ व्या शतकात औरंगजेबाच्या काळात असद खान याने हा किल्ला बांधला किंवा किल्ल्याची पुनर्बांधणी केली.
अकोला (असदगड) किल्ल्याला पूर्वी अनेक बुरूज होते, ज्यापैकी असद बुरूज, फतेह किंवा पंच बुरूज, आणि अगरवेस बुरूज प्रमुख होते.
अकोला किल्ला हा प्रामुख्याने दगड, माती आणि चुना वापरून बांधलेला एक भुईकोट किल्ला आहे.
अकोला किल्ल्याच्या तटबंदीवर आणि प्रवेशद्वारावर जुन्या काळातील फारसी शिलालेख पाहायला मिळतात, जे मुघल काळातील इतिहास सांगतात.
अकोला किल्ला सध्या अत्यंत जीर्ण आणि पडक्या अवस्थेत आहे. जुन्या तटबंदीवर नवीन बांधकामे झाल्यामुळे किल्ल्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.