Shruti Vilas Kadam
अख्खा मसूर, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे, हळद, तिखट, धने-जिरे पूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि पाणी घ्या.
अख्खा मसूर ७ ते ८ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये मीठ आणि पाण्यासह ४ ते ५ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
कढईत तेल गरम करून जिरे घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परता.
टोमॅटो मऊ झाल्यावर हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड आणि गरम मसाला घालून मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परता.
तयार मसाल्यात शिजवलेला अख्खा मसूर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करा. ८ ते १० मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
शेवटी कसुरी मेथी चुरून घाला. इच्छेनुसार थोडे बटर किंवा तूप घातल्यास भाजीची चव आणि सुगंध अधिक वाढतो.
तयार अख्खा मसूर मसाला कोथिंबीर घालून सजवा. हा पदार्थ गरम फुलका, तंदुरी रोटी, नान, जिरा राईस किंवा साध्या भातासोबत अप्रतिम लागतो.