Shruti Vilas Kadam
साधे पण आकर्षक डिझाइन आवडणाऱ्या महिलांसाठी मिनिमल डायमंड मंगळसूत्र उत्तम पर्याय आहे. हे ऑफिस, कॅज्युअल आणि पार्टी लूकसाठी सहज घालता येते.
पारंपरिक काळ्या मण्यांसोबत सुंदर सोन्याचे पेंडंट असलेले मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडमध्ये असते. साडी आणि सूट दोन्हींसोबत ते उठून दिसते.
फुलांच्या आकाराचे पेंडंट असलेले मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये लोकप्रिय आहे. यामुळे लूकला नाजूक आणि एलिगंट टच मिळतो.
हार्ट शेप पेंडंट असलेले मंगळसूत्र रोमँटिक आणि मॉडर्न लूक देणारे आहे. तरुण महिलांमध्ये या डिझाइनची विशेष क्रेझ आहे.
दोन साखळ्यांचे डिझाइन असलेले मंगळसूत्र अधिक रॉयल आणि स्टायलिश दिसते. पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिट्ससोबत ते सुंदर दिसते.
लग्नसमारंभ, सण किंवा खास कार्यक्रमांसाठी कुंदन आणि मोत्यांनी सजवलेले मंगळसूत्र उत्तम पर्याय आहे. यामुळे पारंपरिक लूक अधिक खुलतो.
नेहमीच्या यलो गोल्डऐवजी रोज गोल्ड फिनिश असलेले मंगळसूत्र सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे आधुनिक फॅशनला साजेसे असून प्रत्येक लूकला क्लासी बनवते.