Siddhi Hande
हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे नेहमी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते.
तुम्ही नाश्त्याला स्नॅक्ससाठी ओव्याच्या पानांची पौष्टिक भजी बनवू शकतात. ही भजी बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.
ओव्याची पाने, बेसन पीठ, तांदूळ पीठ, लाल तिखट, मीठ, धणा-जिरे पावडर, तेल
सर्वात आधी तुम्हाला फ्रेश ओव्याची पाने घ्यायची आहेत. ही पाने दोन्ही बाजूंनी स्वच्छ धुवून घ्या.
यानंतर एका भांड्यात बेसन पीठ घ्या. त्यात लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि थोडी मिरची कापून टाकली तरी चालेल.
यामध्ये तुम्ही पाणी टाका. हे पीठ जास्त पातळ आणि जाड करु नका.
यानंतर कढईत तेल गरम करा. यानंतर पीठात ओव्याचे पान बुडवा.
यानंतर एकेक पान तेलात सोडा. यानंतर छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
हे भजी तुम्ही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात. हे भजी खूप पौष्टिक असतात.