Manasvi Choudhary
ओवा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. आपल्यापैकी अनेकांना ओवा खाण्याची सवय असते.
ओवा खाल्ल्याने नेमके शरीराला कोणते फायदे होतात. ओवा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी काही लोकांनी तो खाणे टाळावा. ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
ओवा खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते. पोटदुखी, ब्लोटिंग, गॅस आणि अॅसिडिटी या समस्या असलेल्यांनी ओवा खाणे फायदेशीर आहे.
वातावरणीय बदलामुळे तुम्हाला जर सर्दी- खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही ओव्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. ओवा उष्ण असल्याने कफ पातळ होतो. सर्दी- खोकल्याचा त्रास देखील कमी होतो.
अनेकजण वजन कमी करण्यासाठी ओवा खातात. सकाळी ओव्याचे पाणी पितात. ओवा खाल्ल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर ओवा फायदेशीर आहे. दातदुखी होत असेल तर ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.
१) ओवा उष्ण असल्याने गर्भवती महिलांनी ओवा खाणे टाळावे.
२) ज्यांना तीव्र अॅसिडिटी किंवा पोटात अल्सर आहे, त्यांनी ओवा खाणे टाळावे.
३) ज्यांना पित्ताचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी ओव्याचे सेवन करू नये.