Gangappa Pujari
लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मोठे यश मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षाने कंबर कसली असून राजकीय डावपेच टाकण्यास सुरूवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला असून आगामी निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी नव्या राजकीय रणनितीकाराकडे जबाबदारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नरेश अरोरा यांची विधानसभेसाठी रणनितीकार म्हणून नियुक्ती केली आहे.
नरेश अरोरा हे अरोरा राजकीय कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी Design-Boxed चे सह-संस्थापक आहेत. विशेष म्हणजे ते काँग्रेसशी संबंधित आहेत.
त्यांनी राजस्थान आणि कर्नाटकसह काँग्रेसच्या अनेक निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले आहे.
नरेश अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ९० दिवसांचा प्लॅन केला आहे. ज्यामध्ये अजित पवार यांचे ब्रँडिंग, प्रतिमा डेव्हलप केली जाणार आहे. अजित पवार यांनी आणलेल्या विविध योजनांचा प्रचार केला जाणार आहे.
तसेच शरद पवार गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत. नरेश अरोरा यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील योजना आखल्या जातील.