Shruti Vilas Kadam
ऐश्वर्या राय बच्चन यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील आपल्या ग्लॅमरस उपस्थितीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीसोबत तिची मुलगी आराध्या बच्चन देखील कान्समध्ये दिसली असून दोघींचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या आणि आराध्या यांनी कान्समधील प्रसिद्ध हॉटेल मार्टिनेझमध्ये मुक्काम केला असल्याची माहिती समोर आली आहे. हे हॉटेल जगातील सर्वात आलिशान हॉटेल्सपैकी एक आहे.
रिपोर्टनुसार, या लक्झरी हॉटेलमधील एका रात्रीचे भाडे १,५०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या तिच्या हॉटेलची जोरदार चर्चा रंगली आहे.
हॉटेल मार्टिनेझ आपल्या आलिशान इंटिरियर, प्रायव्हेट बीच, लक्झरी सूट्स आणि फाईव्ह स्टार सुविधांसाठी ओळखले जाते. अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटी येथे राहणे पसंत करतात.
कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान ऐश्वर्याने परिधान केलेले आकर्षक ड्रेस आणि तिचे रेड कार्पेट लूकही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. चाहत्यांकडून तिच्या स्टाईलचे भरभरून कौतुक केले जात आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या रायने आपल्या एलिगंट अंदाजाने कान्समध्ये भारतीय चाहत्यांची मान अभिमानाने उंचावली असून तिचा आलिशान स्टे चर्चेचा विषय ठरला आहे.