ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हालाही दररोज २ GB चा स्वस्त डेटा प्लान पाहिजे तर, एअरटेल की जिओ कोणाकडे आहे बेस्ट 2gb डेटा प्लॅन, जाणून घ्या.
जिओच्या ३४९ च्या डेटा पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते.
जिओच्या ३४९च्या डेटा प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ९० दिवसांसाठी फ्री जिओ हॉटस्टार आणि ५० जीबी Ai क्लाउड स्टोरेजचा फायदा मिळतो.
एअरटेलच्या ३९८ च्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात.
३९८ रुपयांच्या या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सला २८ दिवसांची वैधता मिळते.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी जिओ हॉटस्टार, स्पॅम अलर्ट आणि ३० दिवसांसाठी प्री हॅलो ट्यूनचा फायदा मिळतो.
दोघांच्या डेटा पॅकच्या तुलनेत सर्वात स्वस्त २ जीबी डेटा प्लॅन रिलायंस जिओकडे आहे.